आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्या

Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव

जालना : काही दिवसांपूर्वी जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. मंठा लोणार रस्त्यावर गाडी उभा असताना एका पिकअपने कारला मागून धडक दिल्याने हा अपघात (Jalna Crime) झाला. या अपघातानंतर कारला आग लागली आणि यामध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मृत महिलेचा पती या अपघातातून थोडक्यात बचावला होता. सविता सोळंके (वय 32 वर्ष) असे या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

Nagpur News : धक्कादायक ! गुड बाय एव्हरीवन, स्टेटस ठेवून 25 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

पतीच निघाला आरोपी
डोळ्यासमोर कारला आग लागून पत्नी जळून खाक झाल्याचा बनाव पतीनच केला आणि चौकशीदरम्यान तो फसला.पाच दिवसांनंतर हा उलगडा झाला आहे. मूल होत नसल्याच्या रागातून पत्नीला घटस्फोट देण्यासाठी भाग पाडलं. मात्र पत्नी आपल्या मतावर ठाम असून ती घटस्फोट देत नाही हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने पत्नीला मारण्याचा प्लॅन केला.

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मृत सविता आणि आरोपी अमोल यांच्या लग्नाला तेरा वर्ष झाली होती. तरीदेखील मुलबाळ होत नव्हतं, अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देत असे. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता मात्र सविता त्याला नकार देत होती. याचाच राग मनात धरून पती अमोलने पत्नी सविताला कारमध्ये जिवंत जाळलं. या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.