Pune Crime News

Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह 3 जण निलंबित

824 0

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत (Pune Police News) महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. भररस्त्यात ही घटना घडल्याने संपूर्ण राज्यात (Pune Police News) खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

Pune Crime News : सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्यात नेमके काय घडलं?

पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री हे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Chandrashekhar Azad Ravan : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर जीवघेणा हल्ला

काय घडले होते नेमके?
सदाशिव पेठ भागात 27 जून रोजी सकाळच्या सुमारास सुमारास एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही तरुणी आणि एका तरुणासोबत दुचाकीवरून सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. त्याठिकाणी ते दोघे एकमेकांशी बोलत असताना आरोपी शंतनू जाधव हा तरुण तिथं आला आणि त्याने बागेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला आणि शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. शंतनू जाधव हा हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग करत होता. एवढ्यात या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेऊन तरुणीचा जीव वाचवला.यानंतर शंतनूला चोप देत पेरू गेट पोलीस ठाण्यात (Pune Police News) नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide