72 hoorain

72 Hoorain Trailer Out : ’72 हुरैन’चा ट्रेलर अखेर रिलीज; सेन्सॉर बोर्डाने केला होता विरोध

645 0

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमानंतर आता ’72 हुरैन’ (72 Hoorain) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना कसे दहशतवादी संघटनेत सामील करुन घेतले जाते हे वास्तव दाखवण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) या सिनेमाच्या ट्रेलरवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतरदेखील ह्या चित्रपटाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोकप्रिय दिग्दर्शक संजय पूरन सिंह (Sanjay Puran Singh) यांनी ’72 हुरैन’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ’72 हुरैन’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून ह्याच सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. या सिनेमाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘या’ कलाकारांनी चित्रपटामध्ये केले आहे काम
’72 हुरैन’ या सिनेमात पवन मल्होत्रा आणि आमिर बख्शी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच राशिद नाज, अशोक पाठक आणि नटोतम बेन हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 7 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार ’72 हुरैन’
’72 हुरैन’ हा सिनेमा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये इंग्लिश, मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगली, पंजाबी, भोजपुरी, कश्मीरी आणि आसामी या भाषांचा समावेश आहे. ’72 हुरैन’चा विषय गंभीर असल्यामुळे हा सिनेमा दहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!