Anil Parab

Anil Parab : पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल

604 0

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वांद्रे येथील शाखेचे पाडकाम कारवाईत मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता अजय पाटील हे सहभागी होते.त्यामुळे त्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्यांकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी आमदार अनिल परब (Anil Parab)  यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना (Anil Parab) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून इतर हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.

सांताक्रूझ येथील एच पूर्व वॉर्ड येथे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी आमदार अनिल परब यांच्यासह 40 ते 50 महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांसह जन आक्रोश मोर्चा काढला होता.सांताक्रूझ येथील एच पूर्व वॉर्ड अधिकारी स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासमोर या सर्व कार्यकर्त्यांनी पाण्याच्या समस्या आणि बेकायदा अतिक्रमणांच्या तक्रारी मांडल्या. त्यावेळी इतर विभागाचे अधिकारीसुद्धा तेथे उपस्थित होते.

Pune Crime : अजबच ! लग्नास नकार दिल्याने चक्क महिलेने तरुणालाच पळवलं

ही बैठक सुरु असतानाच वांद्रे येथील शाखेचे पाडकाम करणाऱ्या कारवाईचे नेतृत्व करणारे सहायक अभियंता अजय पाटील यांना बोलवण्यात आले त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ह्याप्रकरणी ही सर्व अटकेची कारवाई करण्यात आली आहे. फरार हल्लेखोरांच्या शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओची मदत घेतली जात आहे अशी माहिती परिमंडळ 8 चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!