Uddhav And Sanjay Raut

Court Summons : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना सन्मस. 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

360 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना मुंबई न्यायालयाकडून समन्स (Court Summons) बजावण्यात आलं आहे. शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर आज मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना समन्स (Court Summons) बजावण्यात आले असून त्यांना न्यायालयाने 14 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले आहेत.पोलिसांनी खासदार राहुल शेवाळे यांचाही जबाब नोंदवून घेतला आहे.

Pune Crime News : सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्यात नेमके काय घडलं?

काय आहे प्रकरण ?
राहुल शेवाळे यांनी ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख पुरावा म्हणून सादर केला आहे. न्यायालयात राहुल शेवळेच्या वतीने, असा युक्तिवाद करण्यात आला की, खासदार शेवाळे यांनी त्यांचे संपूर्ण जीवन शिवसेनेसाठी खर्ची घातले आहे. परंतु खासदार म्हणून माझ्यावर झालेल्या खोट्या रिअल इस्टेटच्या दाव्यांमुळे, त्याचे माझ्या राजकीय आयुष्यावर गंभीर परिमाण झाले आहेत. माझा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेट चा व्यवसाय आहे म्हणत आहात तर याचाच अर्थ माझे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत असा होतो. हे सर्व अत्यंत गंभीर व अनदारपूर्वक आहे असा युक्तीवाद राहुल शेवाळे यांच्यावतीने न्यायालयात केला होता.

Share This News
error: Content is protected !!