Viral Video

Viral Video : ड्रेनेज साफ ​​करताना कामगाराच्या अंगावरून गाडी गेल्याने कामगाराचा मृत्यू

559 0

मुंबई :देशभरात ड्रेनेज लाईन साफ करतांना विषारी वायूमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मुंबईतील कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कामगार मॅनहोलमध्ये ड्रेनेजलाईन साफ करून बाहेर येत असतांना त्याच्या अंगावरून गाडी गेल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरातील रस्त्यावरील मेन हॉल सफाई करून पुन्हा बाहेर येत असताना कर्मचाऱ्याच्या अंगावरून कार गेली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.सदर संपूर्ण घटना हि सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहे.

याप्रकरणामध्ये कारचालक विनोद आणि कंत्रालदार अशा दोघांनाही ताब्यात घेतले असून चालक विनोद उधवानी यांच्यासह कंत्राटदारावरही निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कलम 196 सह कलम 279, 336 , 338, 304 अंतर्गत कांदिवली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ड्रेनेज साफसफाई करताना सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे कंत्राटदार अजय शुक्ला याला अटक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!