President Draupadi Murmu

President Draupadi Murmu : ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानांही मंदिर गाभाऱ्यात प्रवेश नाही?’, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

307 0

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी 20 जून रोजी आपला 65 वा वाढदिवस साजरा केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात पूजा केली. जगन्नाथ रथयात्रा 2023 च्या प्रस्थानापूर्वी, दिल्लीतील हौज खास येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात विशेष प्रार्थनाही करण्यात आली. प्रार्थनेच्या वेळी द्रौपदी मुर्मू मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर उभ्या राहून ही सर्व पूजा बघत असल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात राष्ट्रपती मुर्मू (President Draupadi Murmu) मंदिराच्या गाभाऱ्यात उभ्या राहिलेल्या पाहायला मिळत आहेत.

Karnataka Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे काँग्रेस सरकार कोसळणार; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा दावा

या फोटोच्या कॅप्शनमध्ये आव्हाड यांनी ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानांही गाभाऱ्यात प्रवेश नाही?’, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या राजकीय जोरदार वर्तुळात सुरू आहे. आव्हाडांच्या या ट्विटवर भाजपाची काय प्रतिक्रिया येते. हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!