Electric Shock

Electric Shock : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

3257 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यात पाय टाकल्यानंतर विजेचा धक्का (Electric Shock) लागून एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

काय घडले नेमके?
साक्षी अहुजा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पूर्व दिल्लीमधील प्रीत विहारमध्ये वास्तव्यास होती. पहाटे 5.30 वाजता ती रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत दोन महिला आणि तीन मुलं होती. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत जात असताना तिने विजेच्या खांबाचा आधार घेतला. मात्र यावेळी विजेचा जोरदार धक्का (Electric Shock) बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. ही घटना लक्षात येताच उपस्थित लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक्झिट नंबर 1 वर ही दुर्घटना घडली.

Pune News : पुण्यात लोखंडी तारांचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू..! महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

या घटनेची माहिती मिळताच साक्षीचे कुटुंबीय तातडीने घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तरुणी बेशुद्ध अवस्थेत (Electric Shock) होती अशी माहिती त्यांनी दिली. “साक्षी अहुजा आणि तिची जखमी बहिण माधवी चोप्रा यांनी लेडी हरदिंगे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं”.रेल्वे आणि पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमका निष्काळजीपणा कोणी केला याचा सध्या सुरु आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!