Bhagirath Bhalke

Bhagirath Bhalke : राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके BRS पक्षात करणार प्रवेश?

583 0

पंढरपूर : मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके (Bhagirath Bhalke) यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke)  हे मागच्या काही दिवसांपासून बीआरएसच्या संपर्कात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटलांना पक्षात घेतल्याने भगीरथ भालके नाराज होते.

Devendra Fadnavis : आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर…. फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूरचे तत्कालीन आमदार भारत नाना भालकेंच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंच्या मुलाला म्हणजेच भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली होती. मात्र, भगीरथ भालकेंना (Bhagirath Bhalke) या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे उमेदवार असलेल्या समाधान आवताडेंनी भालकेंना पराभूत करत विधानसभा गाठली. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्षांची ताकत एकत्र असूनही भाजपने भालकेंना पराभूत केलं होतं.

Beed News : प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, विश्वासाने संसार पण थाटला मात्र तिने 3 महिन्यात घेतला टोकाचा निर्णय; नेमके घडले काय?

या पराभवानंतर भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) पक्षात फारसे सक्रिय नव्हते. तसेच शरद पवारांनी साखर सम्राट अशी ओळख असलेल्या अभिजीत पाटलांना पक्षात घेतल्याने त्यांनाच पुढील निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. खुद्द पवारांनी देखील पाटलांना तयारीला लागण्याचे आदेश दिल्याने भालके नाराज होते. आता भगीरथ भालके हे 27 जून रोजी BRS पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

Share This News
error: Content is protected !!