बिहारची राजधानी पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे म्हणाले की , “देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) परिवारावर बोलू नये, अन्यथा परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर आणखी बोललेलो नाही. जर आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही ” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुले पुस्तक आहे उद्धव ठाकरेजी ! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ संदर्भात तुम्ही बोलत आहात, ते आरोपपत्राचा एक भाग आहे आणि न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत. जाणीवपूर्वक त्यावर टाकले आहेत, कारण, आमच्याकडे लपविण्यासारखे काहीच शिल्लक नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तीची एवढी ‘बालबुद्धी’ असावी, याचे आश्चर्य वाटत. त्यामुळे त्याची तुम्ही फार चिंता करु नका. अशा प्रकारे ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी भारतीय जनता पक्षाने विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीवर केलेल्या टीकेला ठाकरे यांनी उत्तर दिलं होते. पाटण्यात पार पडलेली विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल फडवणीस यांनी केली होती. त्यावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “मी पाटण्याला गेलो होतो, त्यावर लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचावसाठी बैठकीला उपस्थित आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे माझ्या परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे. सूरज, शिवसैनिक आणि हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी इतर कुणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहित. त्यामुळे मी माझं कुटुंब जपणार आहे. त्यामुळे परिवार बचाओ बोलू नका.”
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या…
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 24, 2023
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा – फडणवीस
1) सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले.
2) मुंबईला कुणी लुटली
3) मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले .
4) मराठी माणसाला कुणी ओरबाडले.
5)100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते.
तुमचे कारनामे आणि हिंदूत्त्व आता एकेक करीत जनतेत सगळंच उघड होत आहे. आणि होतच राहणार आहे.
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या, बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला.