Mugdha Vaishampayan

Video Viral : मुग्धा वैशंपायनच्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्याने दिलेल्या ‘त्या’ प्रतिक्रियेचा व्हिडीओ व्हायरल

662 0

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी अलीकडेच त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. मागच्या 4 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांनी आपले नाते जगासमोर आणले आहे. सोशल मीडियावर (Video Viral) त्यांनी दोघांचा एक फोटो पोस्ट करत आमचं “ठरलं असं!” लिहिले आहे.

त्यांच्या या पोस्टनंतर त्यांचे चाहते याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील अनेक गायक, कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता एका लोकप्रिय अभिनेत्याने त्यांचं लग्न ठरल्याबद्दल एक खास रील पोस्ट करत (Video Viral) त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता समीर खांडेकर याने एक रील पोस्ट केलं. यात तो आणि अभिनेता विनोद गायकर सोबत मारताना दिसत आहे.

Viral Video : देव तारी त्याला कोण मारी ! एकापाठोपाठ 3 भरधाव गाड्या अंगावरून गेल्या तरी वाचला चिमुकलीचा जीव

काय आहे रीलमध्ये ?
अभिनेता समीर खांडेकर आणि अभिनेता विनोद गायकर हे दोघे गप्पा मारत उभे असल्याचे दिसत आहे. तेव्हा विनोद समीरला म्हणतो, “सम्या, तुला शेवटचं कधी कळलं की काळ निघून गेला आणि आपलं वय झालंय?” त्यावर समीर म्हणतो, “आज सकाळीच. एक बातमी ऐकल्यावर.” त्यावर विनोदने त्याला विचारलं, “कसली बातमी?” त्यानंतर समीर म्हणाला, “अरे मुग्धा वैशंपायन लग्न करत आहे. असं वाटतंय की काल-परवापर्यंत आपण तिला वोटिंग करत होतो. तुला हे ऐकून कसं वाटतंय सांग?” त्यावर विनोद त्याला म्हणाला, “होय. वय झालंय.” असे म्हणताना दिसत आहे. त्या दोघांचं हे मजेदार रील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना (Video Viral) दिसत आहे. मुग्धा आणि प्रथमेश यांनीदेखील या हटके शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!