कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना (Kolhapur Suicide) घडली आहे. यामध्ये अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात (Kolhapur Suicide) मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
आज सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरूमचे दार न उघडल्याने त्याच्या आई यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरुममध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. त्या ठिकाणी एक सुसाईड नोट सापडली असून त्यांच्या मानेवरही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून आपला धक्कादायक शेवट केला आहे. एका प्रकरणामुळे संतोष शिंदे तणावात होते. या प्रकरणात त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणामुळे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. यामुळेच त्यांनी डिप्रेशनमध्ये येऊन आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली.
धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या
अल्पावधीत उद्योग विस्तार
संतोष शिंदे यांनी अगदी अल्प कालावधीत अर्जुन उद्योग समूहात आपलं नाव कमावले होते. अर्जुन उद्योग समूहात तेल उत्पादन, जि, तसेच बेकरी उत्पादनातून राज्यासह कर्नाटकमध्येही उद्योग विस्तार केला होता. त्यामुळे इतका मोठं नाव आणि वलय असल्याने संतोष शिंदे यांनी अशा पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
कारवाई करण्याची मागणी?
संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट (Kolhapur Suicide) केला आहे. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. संतोष शिंदे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपताना परप्रातीयांना मोठी मदत केली होती.