Accident

Accident : जुन्या मुंबई महामार्गावर पीकअप कंटेनरमध्ये भीषण अपघात; 1 ठार तर 2 जखमी

1581 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी केमिकल ट्रकचा अपघात (Accident) होऊन चार जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक मोठा अपघात (Accident) खंडाळा घाटात घडला आहे. जुन्या मुंबई पुणे हायवेवर खंडाळ्या नजीक अंडा पॉइंट येथे आज शनिवारी सकाळी हा अपघात झाला. एका भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरची पीकअप ट्रकची धडक झाली.

Accident : नाशिकमध्ये समोरासमोर धडक होऊन एसटी ट्रकचा भीषण अपघात

या भीषण अपघातात कंटेनर हा पीकअपवर पलटी झाल्याने एक जण ठार झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेलल्या तसेच जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. जखमींना खोपोलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामध्ये पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!