Kedarnath Temple

Viral Video : दोन तरूणांनी घोड्याला जबरदस्ती पाजली सिगारेट; केदारनाथमधील संतापजनक घटना

305 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) केदारनाथमधील आहे. यामध्ये एका घोड्याला दोन तरुण जबरदस्तीने सिगारेट पाजताना दिसत आहेत. या सिगारेटमध्ये अंमली पदार्थांचा सामावेश आहे. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) घोडा-खेचर मालक खेचराचे तोंड दाबून त्याला जबरदस्ती सिगारेट पाजत आहेत. दोन तरूण या घोड्याच्या नाकातून सिगारेटचा धूर देत आहेत. या घोड्याला याचा प्रचंड त्रास होताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आणि पशुपालन विभागाने सदर व्यक्तींविरोधात कारवाई केली आहे.

गौरीकुंड येथून केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 18 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. त्यासाठी येथे घोडे, खेचर किंवा पाठीवर घेऊन जाणे अशा सेवा स्थानिकांकडून पर्यटकांना देण्यात येतात. या प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे.

Share This News
error: Content is protected !!