हल्ली हेडफोन आणि ईयरफोनचा (Headphones VS Earphones) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण याचा वापर करताना दिसत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांचे निरनिराळे हेडफोन तसेच इयरफोन (Headphones VS Earphones) आले आहेत. मात्र याच्या अधिक वापरामुळं आपल्या कानाला इजा होऊ शकते. हेडफोन की ईयरफोन काय अधिक सुरक्षित आहे. हा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात…
दोन्हीमध्ये तसा फारसा फरक नाही. परंतु हेडफोन्स हे इयरफोनपेक्षा थोडे सुरक्षित असतात. इयरफोन कानाच्या आत लावलेले असतात त्यातून निघणारी कंपने कानातील पडद्याच्या अगदी जवळ असतात. तर हेडफोन्स कानाच्या बाहेर असल्यानं हे अंतर थोडे अधिक असततं त्यामूळे हेडफोनमुळं तुलनेत कमी नुकसान होतं. मोठमोठ्या कॉल सेंटर तसेच टेली मार्केटिंग कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना हेडफोन चा वापर अखंडपणे करावा लागतो. त्याचा सातत्यानं वापर केल्यानं कानांचे नुकसान होण्याची भीती असते. आपल्या कानाच्या आत एक पडदा असतो त्याला इयरड्रम म्हणतात त्यात मेंदू आणि इतर अवयवांना जोडणाऱ्या नसा असतात. त्यामुळे त्यांना इजा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दिवसातून 30 मिनिट इतकाचं हेडफोन्स किंवा इयरफोन्स चा वापर केला पाहिजे.
Vada Pav : मुंबईच्या वडापावला सोलापूरचा झणझणीत ‘हा’ वडापाव देत आहे टक्कर? काय आहे स्पेशालिटी
हेडफोन आणि ईयरफोन वापरताना (Headphones VS Earphones) काय काळजी घ्याल
हेडफोन ईयरफोन दीर्घकाळ वापरू नये
ते नेहमी स्वच्छ ठेवा एकमेकांचे वापरू नये
गाणी ऐकण्यासाठी साऊंड सिस्टिम वापरा
हेडफोन ईयरफोन ब्रँडेड कंपनीचेच वापरा
चार्जिंग करताना ब्लू टूथ हेडफोन ईयरफोन वापरणे टाळा
हेडफोन ईयरफोन वापरताना तासामध्ये दहा मिनिटांचा ब्रेक घ्या
झोपताना कानाला लावून झोपणे टाळा
60 टक्के पेक्षा अधिक आवाज वाढवू नये