PATNA-MEEING

Election : आगामी निवडणूक विरोधक एकत्र लढवणार; पाटण्यातील बैठकीत झाला मोठा निर्णय

680 0

पाटणा : वृत्तसंस्था – भाजपाविरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षांची संयुक्त बैठक (Election) आज पाटण्यात पार पडली. या बैठकीस देशभरातील 15 पेक्षा जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठकीनंतर (Election) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची जागावाटपा संदर्भातील बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra Politics : अजित पवारांनी व्यक्त केलेली ‘ती’ भीती खरी ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नवा ट्विस्ट

“आजची बैठक अत्यंत चांगली झाली. तसेच सर्वांनी या लढ्यात एकत्र चालण्यास सहमती दर्शवली आहे. आगामी काळात देशातील प्रमुख विरोधी पक्षाची आणखी एक बैठक पार पडणार आहे. पुढच्या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. सर्व विरोधी पक्षांनी आगामी निवडणुका एकत्र लढवण्यास सहमती दर्शवली आहे”, असं नितीश कुमार म्हणाले.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी पत्नीसह शेतीकामात व्यस्त

“पुढच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. कोण कुठून निवडणुका लढवणार हे आगामी बैठकीत ठरवले जाईल. सध्याचे सरकार हे देशहिताचं काम करत नसून, ते देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईलाही ते विसरले आहेत. त्यामुळे देशात मोठे संकट निर्माण झाले आहे. यापुढे विरोधकांची एकजूट राहणार आहे. असंही नितीश कुमार म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!