Vada Pav

Vada Pav : मुंबईच्या वडापावला सोलापूरचा झणझणीत ‘हा’ वडापाव देत आहे टक्कर? काय आहे स्पेशालिटी

928 0

सोलापूर : महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमध्ये वडापाव (Vada Pav) हा सर्वात फेमस पदार्थ आहे. अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना हा वडापाव (Vada Pav) प्रिय आहे. मुंबई, पुणेसारख्या महानगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खायला मिळतात. सध्या सोलापूरमधील एक वडापाव हा बनवण्याच्या खास शैलीमुळे मुंबईच्या वडापावाला टक्कर देताना दिसत आहे.

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

काय आहे या वडापावमध्ये स्पेशल?
सोलापुरातील ब्रह्मदेव दादा माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जवळ हा आरके वडापाव मिळतो. सर्वसामान्यपणे वडापाव बनवीत असताना तयार भाजी वापरून बटाटा एकत्रित करून त्याचे वडे बनवले जातात. मात्र या ठिकाणी तयार भाजी आणि बटाटा एकत्र करून वडे बनवले जातात.मात्र त्यामध्ये सोलापुरी खर्डा चटणी टाकून तो मिक्स केला जातो.

HEALTH WEALTH : वयाची तिशी ओलांडल्यानंतर…!

त्यामुळे चटणीची खास चवही त्या वड्यामध्ये मिसळते. वडापाव (Vada Pav) तयार करण्याची आमची खास शैली आणि चव यामुळे तो सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे. या वडापावला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सर्वसामान्य वडापावपेक्षा याची टेस्ट वेगळी आहे.

Share This News
error: Content is protected !!