मुंबई : भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India’s squads for West Indies) जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी आता भारतीय संघाने आपल्या टीमची घोषणा केली आहे. या दौऱ्यात कसोटी संघातून (India’s squads for West Indies) पुजाराला डच्चू देण्यात आला तर नवोदित ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार. यशस्वी जैस्वला यांना संधी देण्यात आली आहे. तर एकदिवसीय संघात ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि मुकेश कुमार यांना संधी देण्यात आली आहे.
Team India : टीम इंडियाने फायनलमध्ये बांग्लादेशाचा धुव्वा उडवत आशिया कपवर कोरले नाव
भारताने कसोटीसाठी 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये युवा फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेकडे कसोटी उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे तर रोहित शर्माकडे कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. गोलंदाजीत नवदीप सैनी, जयदेव उनादकट, मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमीला संघातून वगळण्यात आले आहे. शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि आर अश्विन तसेच यष्टीरक्षक म्हणून केएस भरतसोबत इशान किशन या दौऱ्यात असणार आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ (India’s squads for West Indies)
India’s ODI Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Sanju Samson (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), Shardul Thakur, R Jadeja, Axar Patel, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jaydev Unadkat, Mohd. Siraj, Umran Malik, Mukesh… pic.twitter.com/PGRexBAGFZ
— BCCI (@BCCI) June 23, 2023
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उप कॅप्टन), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
भारताचा कसोटी संघ (India’s squads for West Indies)
NEWS – India’s squads for West Indies Tests and ODI series announced.
TEST Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Yashasvi Jaiswal, Ajinkya Rahane (VC), KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, R Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Mohd.… pic.twitter.com/w6IzLEhy63
— BCCI (@BCCI) June 23, 2023
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उप कॅप्टन), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.