Jalna Crime

Jalna Crime : पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा कारमध्ये होरपळून मृत्यू; जालनामधील घटना

541 0

जालना : जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. मंठा लोणार रस्त्यावर गाडी उभा असताना एका पिकअपने कारला मागून धडक दिल्याने हा अपघात (Jalna Crime) झाला आहे. या अपघातानंतर कारला आग लागली आणि यामध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मृत महिलेचा पती या अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

Jalna Municipality : जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका; राज्य सरकारची घोषणा

काय घडले नेमके?
परतुर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी असलेले अमोल गंगाधर सोळंके आणि त्यांची पत्नी सविता सोळंके (वय 32 वर्ष) हे गुरुवारी सायंकाळी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. तिथून पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कार्ला गावाकडे येत असताना मंठा ते लोणार रस्त्यावर असलेल्या महावीर जिनिंग जवळ एका पीक अपने कारला पाठी मागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे कारने पेट घेतला. दुर्दैवाने या अपघातात सविता सोळंके यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Beed Accident : भीषण अपघात ! मुक्ताईच्या पालखीत वाहन घुसल्याने 4 वारकरी जखमी

या घटनेची (Jalna Crime) माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पीकअपने कारला धडक दिल्यानंतर सविता सोळंके यांचे पती अमोल सोळंके हे पीक अप चालकाशी वाद घालत होते. यादरम्यान अचानक कारने पेट घेतला आणि अमोल सोळंके यांच्या डोळ्यासमोरच पत्नी सविता यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कार आणि कारमधील सविता सोळंके जळून खाक झाल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!