Ajit Pawar happy

NCP : राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन रणसंग्राम; अजित पवारांसह ‘या’ 5 नावांची होत आहे चर्चा

726 0

मुंबई : काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा 25 वा रौप्य महोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदी रस नाही असे विधान जाहीर सभेत केले. त्यामुळं त्यांच्या या विधानामुळे आता पक्षात प्रदेश अध्यक्ष कोण होणार यावर सद्या पक्षात घमासान पहायला मिळत आहे. एनसीपी (NCP) पक्षात प्रदेश अध्यक्ष बदलण्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे.

Poster Viral : औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे; ‘त्या’ पोस्टरवरून वातावरण पेटण्याची शक्यता?

छगन भुजबळ यांनी व्यक्त केले मत
जयंत पाटील यांना बदलवून काँग्रेस पक्षाच्या फॉर्म्युला अनुसार अध्यक्ष व्हायला पाहिजे अशी भुमिका एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी मांडली आहे. विरोधी पक्षनेता मराठा असेल तर प्रदेश अध्यक्ष ओबीसी असला पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. याचबरोबर त्यांनी थेट ओबीसी नेत्यांची नावेच सांगितली आहे.

PM Modi in US : बायडेन दाम्पत्याला पंतप्रधान मोदींनी दिल्या ‘या’ खास भेटवस्तू

प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ 5 नावांची होत आहे चर्चा
ओबीसीमध्ये सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड, धंनजय मुंडे, सुनील तटकरे, आणि शेवटी अनुभवी अध्यक्ष हवा असेल तर स्वतः छगन भुजबळ तयार आहे असे मत व्यक्त केले. भुजबळ यांनी भाजप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ओबीसी नेते असल्याचा दाखला ही दिला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी असं राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ यांनी म्हंटलं. तर आमच्या पक्षात ओबीसीला जबाबदारी दिली तर आम्ही ओबीसी समाज जोडू शकतो. आमच्या पक्षात ओबीसी नेते आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!