Narendra Modi In America

PM Modi In US : PM मोदींची अमेरिकेत धडाकेबाज एन्ट्री; विमानतळावर वाजवण्यात आले जन-गण-मन

571 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर (PM Modi In US) आहेत. वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी त्यांना प्रथम गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर भारत आणि अमेरिकेचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. फ्लाइट लाईन सोहळ्याने त्यांचे स्वागत करण्यात (PM Modi In US) आले. पंतप्रधान मोदींचे विमानतळावर अमेरिकेचे मुख्य प्रोटोकॉल अधिकारी रुफस गिफर्ड यांनी स्वागत केले. वॉशिंग्टनमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

PM मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी
या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेनही उपस्थित होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या डिनरला पंतप्रधान मोदी उपस्थित (PM Modi In US) होते. यावेळी खास नरेंद्र मोदींसाठी शाकाहारी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी झाले होते.

Share This News
error: Content is protected !!