Kolhapur Suicide News

Kolhapur Suicide News : स्वतःची चिता रचून मरणाला कवटाळले; वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले

761 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Suicide News) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका वृद्ध दाम्पत्याने बुधवारी आजारपणास कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट (Kolhapur Suicide News) केला आहे. विशेष म्हणजे आपल्या मृत्यूनंतर इतरांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या दाम्पत्याने त्यांच्या चितेसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांच्या शेतात गोळा करून ठेवले होते. या घटनेमुळे गावात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

काय आहे संपूर्ण प्रकरण?
महादेव दादु पाटील (वय-75 ) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील ( वय-70 ) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या वृद्ध दाम्पत्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांच्या माघारी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने वयाच्या सत्तर-पंचाहत्तरीत ते दिवसभर शेतात राबत होते. या वृद्ध दाम्पत्याचे काम पाहून सर्व गावकरी आदराने आणि लाडाने त्यांची गरीब व स्वाभिमानी जोडपे अशी प्रशंसा करत. सर्व गावकरी दोघांना आदराने आण्णा, द्वारकाआई असे म्हणायचे.

धक्कादायक ! जळगावमध्ये महिलेची पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

वयाची सत्तरी गाठल्याने वृद्ध दाम्पत्याला आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी आजाराला कंटाळून आपल्या जीवनाचा शेवट करायचा ठरवले. त्या अगोदर या दोघांनी आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्यांना त्रास नको म्हणून अग्नी देण्यासाठी शेतातील एका कोपऱ्यात आत्महत्येच्या आदल्या दिवशी सायंकाळी जागा केली. अग्नी देण्यासाठी लाकडे गोळा करून ठेवली. त्याच ठिकाणी पाण्याची घागर भरुन ठेवली. गवत गोळा करुन ठेवलं, मयताचे साहित्य इत्यादी कामे स्वतःच करुन ठेवली. यानंतर त्यांनी रात्री दोन वाजताच्या सुमारास राहत्या घराच्या माळ्यावरील तुळईस नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या (Kolhapur Suicide News) केली. सहा.पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!