Aadipurush Movie

Adipurush Movie : आदिपुरुष सिनेमावर बंदी आणा, शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराने केली मागणी

473 0

नवी दिल्ली : आदिपुरुष (Adipurush Movie) या सिनेमावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या सिनेमाच्या (Adipurush Movie) कथानकापासून वेषभूषा आणि संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. इतिहास आणि तथ्याला धरून हा सिनेमा बनवण्यात आला नसल्याची टीका यावर करण्यात येत आहे.

Jalgaon Crime : भररस्त्यात मुलांसमोरच बापाने घेतला आईचा जीव; जळगाव हादरलं

या सिनेमाच्या विरोधात काही हिंदुत्वादी संघटना मैदानात उतरल्या आहेत. तर नेपाळमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपच्या काही खासदारांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. आता या चित्रपटाच्या वादामध्ये शिंदे गटाच्या खासदाराने उडी घेत मोठी मागणी केली आहे.

WhatsApp New Feature : अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल्स होणार बंद; व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले ‘हे’ जबरदस्त फिचर

शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आदिपुरुष सिनेमावर (Adipurush Movie) बंदी घालण्याची मागणी केली आहे. आदिपुरुषमुळे भारताची बदनामी होत असल्याचा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे. श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसून जोशी यांना पत्र लिहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!