Warkari

Insurance Coverage : शासनातर्फे वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना मिळणार दिलासा

556 0

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण (Insurance Coverage) देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण (Insurance Coverage) मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

मोठी बातमी : पंढरपूरला निघालेल्या 12 वारकऱ्यांना कारची जोरदार धडक; भीषण अपघातात 6 वारकरी जागीच ठार

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

Dagdushet Ganapati : ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारण्यात येणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना (Insurance Coverage) आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!