Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! शिक्षीका पत्नीचा खून करून दोन मुलांना विहरीत टाकून डॉक्टर पतीची आत्महत्या

10238 0

दौड : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका डॉक्टरने आपले अख्ख कुटूंबंच संपवले आहे. यामध्ये पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या (Pune Crime) केली व स्वतः घरी जाऊन आत्महत्या केली. डॉक्टर यांची पत्नी शिक्षिका होती. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), अदिवत अतुल दिवेकर ( वय 9) वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

Jalgaon Crime : भररस्त्यात मुलांसमोरच बापाने घेतला आईचा जीव; जळगाव हादरलं

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दिवेकर यांनी प्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहिरीजवळ गेले. यानंतर आरोपीने मुलांना विहिरीत टाकून दिले. यानंतर (Pune Crime) घरी येऊन आत्महत्या केली. डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हे कृत्य करण्यापुर्वी डॉ. दिवेकर यांनी चिठ्ठी लिहिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाटस व यवत पोलीसांनी धाव घेतली. दोन लहान मुले अद्याप सापडली नसून त्यांचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!