Swaminathan Janakiraman

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन यांची नियुक्ती

773 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन ( Swaminathan Janakiraman) यांची नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती ही तीन वर्षासाठी असणार आहे. सध्या स्वामिनाथन जानकीरामन हे भारतीय स्टेट बॅंकेचे (SBI) व्यवस्थापकीय संचालक आहेत. सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर महेश कुमार जैन यांचा कार्यकाळ 22 जून रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतर स्वामिनाथन जानकीरामन डेप्युटी गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारतील.

RBI चा कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ नाही, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

RBI ने ठोठावला 13 बँकांना दंड ! महाराष्ट्रातील ‘या’ बँकांवर होणार दंडात्मक कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकारने 1 जून रोजी मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंध निदेशक आणि सीईओ ए एस राजीव, यूनियन बँकेचे अध्यक्ष श्रीनिवासन वरदराजन ,यूको बँकेचे एमडी ,सीईओ सोमा शंकर प्रसाद,इंडियन बँकेचे एमडी आणि सीईओ एस. एल. जैन व स्टेट बँक ऑफ इंडियाचे मैनेजिंग डायरेक्टर स्वामीनाथन यांचा समावेश होता.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide