video

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

471 0

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये काही चांगले तर काही धक्कादायक व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर एक धक्क्कादायक व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, काळी जादू केल्याच्या संशयावरून एका जोडप्याला झाडावर टांगून मारहाण केली जात आहे. तेलंगणातील सँगरेड्डी जिल्ह्यातील कोलकूर गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्यामाम्मा आणि यादाह असे मारहाण करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

काय आहे नेमके प्रकरण?
या दाम्पत्याकडून घरात काळी जादू केली जात होती, असा ग्रामस्थांना संशय होता. या काळ्या जादूमुळे गावाला धोका होता. याच संशयातून गावकऱ्यांनी या दाम्प्त्याला झाडाला टांगले आणि बेदम मारहाण केली. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

जमिनीच्या वादावरून सुट्टीवर आलेल्या जवानाला अन् कुटुंबियांना गावगुडांकडून मारहाण

https://twitter.com/ambedkariteIND/status/1670728425261211648

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी या दाम्पत्याला झाडावरून काढले. हे दाम्पत्य या मारहाणीत (Video) मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांविरोधात तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!