Breaking News
Tukaram Maharaj Palkhi

Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडले

881 0

इंदापूर : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj Palkhi) सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पार पडले. यावेळी या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj Palkhi) सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले.

Beed Accident : भीषण अपघात ! मुक्ताईच्या पालखीत वाहन घुसल्याने 4 वारकरी जखमी

पालखीला अगोदर प्रथम झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी (Tukaram Maharaj Palkhi) बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फे-या केल्या, रिंगण सोहळ्यात (Tukaram Maharaj Palkhi) वारकऱ्यांचा रिंगणात उत्साह दिसून आला.

तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डीलाच का असतो? जाणून घ्या यामागची रंजक कथा

पूर्णदेहभान हरपून विठुनामाचा जप करीत, तुकाराम महाराजांचा जयघोष करीत वारक-यांनी पहिले गोल रिंगण पूर्ण केले. पालखीचा (Tukaram Maharaj Palkhi) हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Share This News
error: Content is protected !!