Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार मर्डर केसचं गूढ वाढलं.., तिचा मित्रही गायब?

31522 0

पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ) 26 वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (Darshana Pawar Murder Case) आढळून आला होता. या प्रकरणामुळे (Darshana Pawar Murder Case) परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

काय घडले नेमके?
दर्शनाने ‘एमपीएससी’ परीक्षेत यश संपादित केल्यामुळे एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दर्शनाचा सत्कार करण्यात येणार होता. हा कार्यक्रम दहा तारखेला टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात पार पडला. मात्र, या कार्यक्रमानंतर तिचा फोन लागला नाही, असे तिच्या पालकांकडून सांगण्यात आले. यानंतर मृत दर्शनाच्या पालकांनी संबंधित संस्थेत चौकशी केली असता, कार्यक्रमानंतर दर्शना तेथून गेल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या वडिलांनी 12 जूनला सिंहगड रोड पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.

Hardeep Singh Nijjar : कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

यानंतर तिच्या पालकांनी दर्शनाच्या मित्र परिवारात चौकशी केल्यावर ती राहुल दत्तात्रय हंडोरे (Rahul Dattatraya Handore) याच्याबरोबर सिंहगड आणि राजगड किल्ला पाहण्यासाठी जाणार होती, असे समजले. यानंतर तिचा मित्र राहुल हंडोरे हादेखील बेपत्ता आहे. तरुणीच्या मृतदेहाजवळ तरुणाचे जर्किन सापडले आहे. मात्र राहुल दत्तात्रय हंडोरे यांचा अजून थांगपत्ता लागला नाही. त्याचे नातेवाईकदेखील त्याचा शोध घेत आहेत. यामुळे हा घातपात आहे, की अजून काही? याचा तपास वेल्हे पोलिस (Velhe Police) करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
दर्शना दत्तू पवार (Darshana Dattu Pawar) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती नुकतीच एमपीएससीची (MPSC) परीक्षा परीक्षा पास झाली होती. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती. 15 जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये ही तरुणी हरवली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह आढळून आला.

Share This News
error: Content is protected !!