Adipurush

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये राडा; बंद पाडण्यात आला शो

592 0

नालासोपारा : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट (Adipurush) प्रदर्शित झाल्यापासून मोठ्या प्रमाणात वाद झाला आहे. या चित्रपटात कलाकारांच्या तोंडी असलेले डायलॉग हे अत्यंत ‘टपोरी’ भाषेतील असल्यामुळे नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. रामायणासारख्या महाकाव्यातील पात्रांना दिलेला लूक, व्हीएफक्स आणि डायलॉग्सवरून या चित्रपटाला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या चित्रपटातून (Adipurush) हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप काही हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे. नालासोपाऱ्यात या चित्रपटाच्या शोदरम्यान मल्टिप्लेक्समध्ये हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

Liver Donate : पोरीने ऋण फेडले! बापाला यकृत दान करून मरणाच्या दारातून माघारी आणले

काय घडले नेमके?
कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये राडा घालून आदिपुरुषचं स्क्रिनिंग बंद पाडलं आणि घोषणाबाजी केली. यावेळी मल्टिप्लेकचे कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्यात मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाचीसुद्धा झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ‘आदिपुरुष’मधील डायलॉग्सवर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर निर्मात्यांनी ते संवाद बदलणार असल्याची माहिती दिली आहे.

Aditya L-1: ‘आदित्य एल – 1’ चे स्वातंत्र्यदिनापूर्वी उड्डाण होण्याची शक्यता; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये ?

नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनावर बंदी
नेपाळमधील काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी लागू करण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात (Adipurush) सीतेचा उल्लेख ‘भारत की बेटी’ म्हणून केल्याने हा वाद सुरू झाला आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडू महानगर क्षेत्रातील सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याला पाठिंबा दर्शवला आहे. आदिपुरुष या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 300 कोटींचा आकडा पार केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!