IPS Ravi Sinha

IPS Ravi Sinha : IPS रवी सिन्हा “रॉ” चे नवे प्रमुख

857 0

भारताची गुप्तचर यंत्रणा “रॉ” च्या (RAW) प्रमुखपदी आयपीएस अधिकारी रवी सिन्हा (IPS Ravi Sinha) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आज त्यांच्या (IPS Ravi Sinha) नियुक्तीची घोषणा केली आहे. सध्याचे “रॉ” चे प्रमुख समंत कुमार गोयल आहेत. गोयल यांना सरकारने अनेक अनेक वेळा कार्यकाळ वाढ दिली होती. परंतु पुन्हा गोयल यांचा कार्यकाळ वाढवण्यास केंद्राने नकार दिला.त्यामुळे त्यांच्या कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे.

Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी

रवी सिन्हा (IPS Ravi Sinha) हे 1988 च्या छत्तीसगढ बॅचचे अधिकारी आहेत. सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर आहेत. त्यांची ही पोस्ट स्पेशल सेक्रेटरी रँकची आहे. रवी सिन्हा (IPS Ravi Sinha) यांची “रॉ” च्या प्रमुखपदी नियुक्ती ही दोन वर्षासाठी असणार आहे. त्यांची ही पोस्टिंग देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची ठरणार आहे. सध्याचे “रॉ” चे प्रमुख समंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी सिन्हा (IPS Ravi Sinha)”रॉ” च्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील.

Share This News
error: Content is protected !!