Beed Accsident

Beed Accident : भीषण अपघात ! मुक्ताईच्या पालखीत वाहन घुसल्याने 4 वारकरी जखमी

571 0

बीड : बीडमधून (Beed Accident) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुक्ताईच्या पालखीत (Muktai Palkhi) भरधाव दुचाकी घुसल्याने 4 महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. या भीषण अपघाताची (Beed Accident) माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Accident : हिंगोलीत भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

काय घडले नेमके?
पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव दुचाकी घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीडच्या मोरगाव फाट्याजवळ घडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात ! दिंडीत रिक्षा घुसल्याने अनेक वारकरी जखमी

जखमींची प्रकृती स्थिर
अपघाताची (Beed Accident) माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे (District Surgeon Dr. Suresh Sable) यांनी उपचाराबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी स्वतः जखमी महिला वारकऱ्यांवर उपचार केले. या जखमी वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. साबळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!