Fire

Fire In Pune : पुण्यातील गंगाधाम चौकातील गोडाऊनला भीषण आग

493 0

पुणे : काही दिवसांपूर्वी कर्वेनगर या ठिकाणी लागलेल्या आगीची (Fire) घटना ताजी असताना आज पुन्हा पुण्यातील गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळ असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग (Fire) लागली आहे.

मार्केटयार्ड येथे पुन्हा एकदा भीषण आग ! दोन कामगारांचा मृत्यू तर 1 जण जखमी

या गोडाऊनमध्ये विविध प्रकारचे सिमेंट, मोल्डिंग साहित्य जळून खाक झाले आहेत. ही आग एवढी भीषण होती कि यामध्ये शेजारी असलेल्या मांडवाचे सामानदेखील पेटले आहे. ही आग (Fire) एवढी भीषण आहे कि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

दिल्लीतील कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरुन मारल्या उड्या

काय घडले नेमके?
आज सकाळी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात आईमाता मंदिराजवळ गोडाऊनला आग लागल्याची वर्दी मिळताच गंगाधाम व कोंढवा अग्निशमन केंद्र येथून वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचत असताना खुप दुरवरुन मोठ्या प्रमाणात धुर दिसत असल्याने जवानांनी आगीचे भीषण स्वरुप पाहता अग्निशमन वाहनांची अतिरिक्त मदत मागविली. अग्निशमन दलाकडून 14 फायरगाड्या व 06 वॉटर टँकर तसेच पीएमआरडीए अग्निशमन दलाची 02 वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. (एकुण अग्निशमन वाहने 22) महापालिका पाणीपुरवठा विभाग यांचेकडून ही 10 च्या वर वॉटर टँकर पाठविण्यात आले होते. सदर ठिकाणी अंदाजे 20 ते 25 विविध साहित्य जसे की, सिमेंट, मांडव साहित्य, कपडे, साबण, ऑईल पेंट, काच, रबर, वायरिंग व इतर अनेक प्रकारचे साहित्य होते.

चोहोबाजूंनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करुन शेजारीच असलेल्या वस्तीत आग पसरु नये याची जवानांनी काळजी घेतल्याने मोठा धोका टळला. याठिकाणी किमान 100 च्या वर गोडाऊन असून इतर उर्वरित गोडाऊन व शेजारीच ट्रॉन्सपोर्टचे असलेले किमान 25 ट्रक वाचविण्थात अग्निशमन दलाला यश आले आहे. सकाळी हवा मोठ्या प्रमाणात व वारयाचा वेग जोरात असल्याने आग झपाट्याने पसरली. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे तसेच जवळपास 15 अधिकारी व 100 जवान आग विझवण्याचे काम करीत आहेत. महापालिकेचे मुख्य अभियंता श्री. कंदुल साहेब व क्षेत्रीय अधिकारी व सर्व कर्मचारी, JCB वाहने या सह घटनास्थळी सुरवातीपासूनच सर्वोतपरी मदत कार्यात सक्रिय पणे सहकार्य करीत आहेत.. श्री. पावसकर साहेब यांनी देखील मुबलक पाणी उपलब्ध होईल या साठी स्वतः लक्ष ठेवून वॉटर टँकर ची व्यवस्था केली. सध्या आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने अद्याप या घटनेत कोणी जखमी अथवा जिवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!