Monsoon Update

आयएमडीने राज्यातील मान्सूनबाबत दिले ‘हे’ महत्वाचे अपडेट

613 0

पुणे : बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातमधून राजस्थानात गेले आहे. सध्या हे चक्रीवादळ राजस्थान, पाकिस्तानच्या काही भागात आहे. तसेच त्याचा वेग फार कमी झाला आहे. तसेच पुढच्या 6 तासात त्याचा वेग अजून कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात मान्सून 11 जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर 15 जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. त्यामुळे आपल्याला अजून काही काळ मान्सूनची वाट पहावी लागणार आहे असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

सध्या कुठे आहे मान्सून
मान्सून रत्नागिरीतच थांबला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीला विलंब झाला आहे. नैऋत्य मान्सून भारतात 4 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर देशभरात त्याची वाटचाल सुरु होते. परंतु नैऋत्य मान्सूनला पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असली तरी त्याला काही काळ लागणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide