Kolhapur Crime

आईच्या मृत्यूची बातमी समजताच मुलानेदेखील रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

2381 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आईच्या मृत्यूची बातमी समजताच दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलाला धक्का लागला आणि त्याचाही मृत्यू झाला. गोपाळ खंडू पाटील (रा. शिरोळ, तालुका सैनिक टाकळी) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याची आई पूजेसाठी कृष्णा नदीत गेली होती. यादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आई आणि मुलाच्या अश्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावामध्ये घडली आहे. मंगळवारच्या सुमारास ही घटना घडली. जन्मदात्या आईचा कृष्णा नदीत पुजनासाठी गेल्यानंतर बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाने आपला जीव सोडला. गोपाळ पाटील यांच्या आई बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोपाळ पाटील यांना डेंग्यूसदृश आजार झाला होता. यामुळे त्यांच्यावर सांगलीमधील एका दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच त्यांना आपल्या मृत्यूची बातमी समजली. या घटनेनंतर गोपाळ पाटील यांनाा मानसिक धक्का बसला. आणि बुधवारी पहाटे आईच्या पाठोपाठ त्यांचाही मृत्यू झाला. माय लेकरांचा मृत्यू अवघ्या काही तासांच्या अंतरावर झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत गोपाळ यांच्या माघारी वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

Share This News
error: Content is protected !!