मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची कृषी क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन 1 जुलै हा राज्य कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिन साजरा करण्यासाठी पंचायत समित्यांना 10 हजार तर जिल्हापरिषद मुख्यालयात कृषी दिन साजरा करण्यासाठी 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
