School

World’s Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या ‘या’ 3 शाळांचा समावेश

790 0

2023 चे जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारताच्या पाच शाळांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारच्या माध्यमातून या शाळांना तब्बल अडीच लाख डॉलरचे बक्षिस दिले जाते. हा पुरस्कार समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे किती योगदान आहे यावरून दिला जातो.

जगातील टॉप 10 स्कूलमध्ये ‘या’ भारतीय शाळांचा समावेश
पुरस्कार मिळालेल्या शाळांमध्ये दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचा समावेश आहे. यात मुंबईतील दोन आणि अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेचा समावेश आहे.दिल्लीतील सरकारी स्कूल नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-Block दिलशाद कॉलनी तसेच या वर्गात मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचा देखील समावेश आहे. ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल ही खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे.

गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल, अहमदाबाद ही देखील एक खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. तर ‘ स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र ‘ ही अहमदनगरमधील एक धर्मादाय शाळा आहे.’स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र ‘ या शाळेमध्ये HIV/AIDS ग्रस्त मुलांना तसेच सेक्स वर्कर कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन बदलण्याचे मोठे काम केले जाते. पाचवी शाळा मुंबईतील दादरमधील आहे. दादरमधील शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल. (द आकांक्षा फाउंडेशन), ही शाळा मुंबईतील एक चार्टर स्कूल आहे.

Share This News
error: Content is protected !!