Sharad Pawar Jalgaon

सावरकर, हेगडेवारांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळल्याप्रकरणी शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

750 0

जळगाव : कर्नाटक सरकारने हेगडेवार आणि सावरकर यांचे धडे पाठपुस्तकातून वगळल्यामुळे भाजपने जोरदार टीका केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत सावरकर आणि हेगडेवार यांचे पाठ्यपुस्तकातून धडे वगळण्याचे आश्वासन कर्नाटकाच्या जनतेला दिले होते. त्या निर्णयास आधीच कर्नाटकाच्या जनतेने पाठींबा दिला आहे. त्यामुळे धडे वगळल्याने कोणतेही सामाजिक ऐक्य धोक्यात येईल असे मला वाटत नाही. असे शरद पवार म्हणाले आहेत.

तसेच शरद पवार यांनी शिंदेच्या जाहिरातीवरदेखील आपले मत मांडले आहे. ते म्हणाले शिंदेच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली  असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच सत्ताधारी पक्षाची विचारधारा देशासाठी घातक आहे. देशांत प्रादेशिक पातळीवर भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत आहेत. देश पातळीवरही भाजपाला दूर ठेवण्याचा विचार देशातही दिसत आहे. त्यामुळे मी देशातील सर्व विरोधी पक्षाची बोलणार आहे. असे शरद पवार म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!