Nashik Murder

वडिलांनी दिलेला ‘तो’ आदेश ऐकून, लेकाने जन्मदात्या बापालाच संपवले

954 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांनी शेतात कामाला जाण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्याने चक्क पोटच्या लेकाने जन्मदात्या बापाची डोक्यावर फावड्याने वार करून हत्या (Murder) केली आहे. ही धक्कादायक घटना 14 जून रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या निगडोळ या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
दिंडोरी तालुक्यात आसलेल्या निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने (55) (Sahebrao Muralidhar Malsane) यांनी त्यांचा मुलगा पप्पू उर्फ हिरामण साहेबराव मालसाने यास शेतात काम करायला जा, असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने मुलगा पप्पूने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात, पाठीमागे, उजवा हात व उजव्या पायावर फावड्याने वार केला. यात घाव वर्मी लागल्याने वडील साहेबराव गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गोरख साहेबराव मालसाने यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित पप्पू मालसाने याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी पोलीस (Dindori Police) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!