Navi Mumbai

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

798 0

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरामध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या नागेश लिंगायत आणि त्यांची पत्नी आरती या जोडप्याला हप्ता न दिल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना नवी मुंबईतील महापे या ठिकाणी घडली आहे.

काय घडले नेमके?
महापे (Mahape) येथे राहणारे नागेश लिंगायत (Nagesh Lingayat) आणि त्यांची पत्नी आरती हे दोघे वडापावची गाडी लावून आपला उदरनिर्वाह चालवतात. याच परिसरात असणारे स्थानिक गुंड त्यांना धमकावत होते. “या ठिकाणी वडापावची गाडी लावायची असेल तर चार हजारचा हप्ता द्यावा लागेल”, असं त्यांना धमकावले. परंतु जोडप्याने त्याला हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना त्या स्थानिक गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणावरून नागेश लिंगायत आणि त्यांची पत्नी आरती लिंगायत यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी गुंडाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या आरोपी गुंडाला अटक केली आहे. नागेश लिंगायत हे महापे येथील हनुमान नगर येथे राहत असून ते नोकरी करत होते. मात्र, नोकरी करून येणाऱ्या पैशांमध्ये घर खर्च भागत नव्हता, वाढत्या महागाईचा विचार करून पत्नी आरतीने आपल्या पतीला साथ देण्यासाठी महापे मिलेनियम बिजनेस पार्क बस स्थानकाच्या बाजूला वडापावची गाडी चालू केली होती.

Share This News
error: Content is protected !!