Chandrakant Patil

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यापासून संपुर्ण वेतन आयोग लागू; चंद्रकांत पाटलांची माहिती

452 0

पुणे : मागील काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया (Om Prakash Bakoria) यांनी 50 टक्के सातवा वेतन आयोग पीएमपी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. त्यानंतर पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली होती.

ही मागणी आता पूर्ण झाली असून पुढच्या जुलै 2023 या महिन्यापासून संपूर्ण कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पीएमपी कर्मचाऱ्यांचे आणि अन्य विषयांसंदर्भात चर्चा झाली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!