Santosa Hotel

पिंपरी चिंचवडमध्ये वॉटर पार्क मध्ये बुडून 6 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

671 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील रावेत पोलिस स्टेशन (Rawet Police Station) हद्दीतील नामांकित सेंटोसा हॉटेल मध्ये असलेल्या वॉटर पार्क मध्ये बुडून एका 6 वर्षे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रावेत पोलिसांनी सेंटोसा हॉटेल मालक अजय हरीलाला हिंदुजा आणि हॉटेल व्यवस्थापक राहुल आबा मोरे यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा करत मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सेंटोसा हॉटेल मधील स्विमिंग पुलाला सुरक्षा कठडे नसणे लाइफ गार्ड उपस्थित नसणे आणि हयगई केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची फिर्याद स्वतः पोलिसांनी दिल्याने आरोपींना अटक केली जाणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News
error: Content is protected !!