Brijbhishan Singh

दिल्ली पोलिसांनी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध दाखल केली चार्जशीट

465 0

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी कुस्तीपटू गेल्या महिन्यापासून आंदोलन (Wrestler Protest) करत होते. एका अल्पवयीन कुस्तीपटू मुलीसह एकूण 6 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर काही आरोपींविरुद्ध नवी दिल्ली अंतर्गत कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एसआयटी पथकाची स्थापना केली होती.

या प्रकरणी तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंडसह अनेक राज्यांना भेटी दिल्या. त्यांनी आतापर्यंत डझनभर लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या घरी जाऊन देखील त्यांच्या घरात काम करणाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप करणाऱ्या 6 महिला पैलवानांपैकी चौघांनी पोलिसांना या प्रकरणातील पुरावे दिले आहेत. या महिला पैलवानांनी ब्रिजभूषण यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता आपली पहिली चार्जशीट सादर केली आहे.

Share This News
error: Content is protected !!