Devendra Fadanvis Tweet

आदिपुरुष चित्रपटासाठी देवेंद्र फडणवीसांनी शेअर केले ‘हे’ खास ट्विट

494 0

मुंबई : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांचा ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा बहुचर्चित सिनेमा उद्या (16 जून) रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. अनेक जण या चित्रपटाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर करुन आदिपुरुष या चित्रपटाच्या टीमला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

काय लिहिले ट्विटमध्ये?
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, देवेंद्र फडणवीस हे आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर बघत आहेत. ‘मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर प्रभू श्री राम यांची कृपा व्हावी ही प्रार्थना. दिग्दर्शक, निर्माते आणि आदिपुरुष चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा!’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide