Megha Dhade

‘बिग बॉस मराठी फेम’ मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; ‘या’ राजकीय पक्षात केला प्रवेश

671 0

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) ही आपल्या बोल्ड लुक आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. तिने आजवर अनेक मालिका, चित्रपट, रिएलिटी शोमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) मुळे. ती बिग बॉस मराठीची विजेती राहिलेली आहे. एवढेच नाही तर बिग बॉस हिंदीमध्ये देखील तिने भाग घेतला होता. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेक विषयांवर आपले मत मांडत असते. आता मेघा धाडेने राजकीय पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

‘या’ पक्षात केला प्रवेश
अभिनेत्री मेघा धाडेने भाजप’मध्ये (BJP) प्रवेश केला आहे. मेघाच्या पक्ष प्रवेशावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः उपस्थित होते. तसेच भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डेही (Priya Berde) उपस्थित होत्या. सोशल मीडिया पेजने मेघाचा पक्ष प्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची ती विजेतीआहे. ‘बिग बॉस’मध्ये तिने आपल्या दमदार खेळीने सर्वांना प्रभावित केले होते. मेघा धाडे सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी आजही तिचा तगडा चाहतावर्ग आहे.

Share This News
error: Content is protected !!