Gautami Patil And Mother

गौतमी पाटीलचा आपल्या आईसोबतचा ‘तो’ Video व्हायरल; पहिल्यांदाच मायलेकींनी शेअर केली एकत्र स्क्रीन

3508 0

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचे खूप चाहते आहेत. ती आपल्या डान्समुळे रोज चर्चेत असते. तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गौतमी पाटीलची कोणतीही गोष्ट असो, क्षणात ती व्हायरल होत असते. तिचा चाहता वर्ग इतका मोठा आहे की, तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाटेल ते करायला तयार असतात.

काही दिवसांपूर्वीच गौतमीनं आपल्या आई सोबतचा एक फोटों शेयर केला होता. गौतमी अगदीच लहान असतानाचा हा फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. आता मात्र तिच्या आईचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये गौतमीचा एका चाहता म्हणाताना दिसत आहे की, ”उंबराच्या झाडाला दत्तगुरूंची सावली.. गौतमीला जन्म देणारी धन्य ती माउली”. तो असे म्हणताच गौतमीची आई समोर येते आणि गौतमी आपल्या आईला घट्ट मिठी मारते. गौतमीच्या आईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!