Bribe Cheque

मुख्याध्यापक तुम्ही सुद्धा? चक्क! मुख्याध्यापकाला ‘इतक्या’ रुपयांची लाच घेताना अटक

606 0

नाशिक : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजाराच्या लाचेची मागणी करून ती चेकद्वारे घेणाऱ्या मुख्याध्यापकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह लिपीक आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी विनोद शंकर जाधव (वय 42, पद – मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव. रा. योगेश्वर नगर, कजगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह नरेंद्र उत्तम वाघ (वय 44, पद – कनिष्ठ लिपीक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, जि. जळगाव. रा. समर्थ नगर, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव) आणि विजय पंढरीनाथ महाजन (वय 56, पद – अध्यक्ष, श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव. रा. माळी वाडा, एरंडोल, जि. जळगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि. 01/04/2023 रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे करण्यात आल्या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि. 02/05/2023 रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला होता. सदर तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आले. या मोबदल्यात आरोपींनी 75,000/-रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले. यानंतर मागणी केल्याप्रमाणे 75,000/-रू.चा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्विकारताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन (Erandol Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर (Nashik ACB SP Sharmistha Gharge-Walawalkar), अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील (DySP Shashikant Patil), पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव (PI N.N. Jadhav), पोलिस निरीक्षक एस.के. बच्छाव (PI S.K. Bachhav), पोलिस अंमलदार सुनिल पाटील, रविंद्र घुगे, ईश्वर धनगर, सचिन चाटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, महिला पोलिस हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, पोलिस अंमलदार प्रदिप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि प्रणेश ठाकुर यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!