Tankar

चंदननगर येथे दुभाजकाला धडकून ऑइल टँकर उलटला

1861 0

पुणे : शेरी नगर रस्त्यावर चंदननगर येथे ऑइल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास दुभाजकाला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. रात्रीपासून टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑईलगळती सुरु आहे. या अपघातामुळे नगर रस्त्यावरची वाहतूक ही बीआरटी (BRT) मार्गातून वळविण्यात आली आहे. हा टँकर पुण्यातून नगरच्या दिशेने जात होता.

संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि येथील वाहतूक वळवण्यासाठी याच कंपनीचा दुसरा टॅंकर रस्त्याला आडवा लावण्यात आलेला आहे. या घटनेमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!