Nivedita Saraf

निवेदिता सराफ यांना मॉलमध्ये आला ‘हा’ वाईट अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाल्या….

3610 0

मराठमोळी अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्या मालिकेच्या सेटवरील असो किंवा दैनंदिन जीवनातील अपडेट्स त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अलीकडेच त्यांना एक वाईट अनुभव आला. त्यांनी तो अनुभव इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यांनी मालाडच्या एका मॉलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे.

काय लिहिले पोस्टमध्ये?
“मी मालाडच्या इन्फिनिटी मॉलमधील मॅक्स स्टोरमध्ये गेले होते. तिथला स्टाफ फारच वाईट वागणूक देणारा होता त्यामुळे मला फार वाईट अनुभव आला आहे. तुम्ही काय खरेदी करत आहात आणि काय नाही याच्याशी त्यांना काहीच घेणंदेणं नव्हतं. एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला वेळ नाही सांगत तिने दुसऱ्या सेल्समनला बोलावलं. दुसऱ्या एका सेल्समनने मला ओळखलं आणि माझी माफी मागितली. त्याने मॅनेजरला बोलावलं. मी सेलिब्रिटी आहे म्हणून नव्हे तर मी एक ग्राहक आहे म्हणून मला चांगली वागणूक हवी होती. मी ते डिझर्व्ह करते आणि जो स्टोरमध्ये येईल तो प्रत्येक व्यक्ती हे डिझर्व्ह करतो.’ अशी पोस्ट त्यांनी केली.

https://www.instagram.com/p/CtTfQvVJpIr/?utm_source=ig_embed&ig_rid=060bd3d3-8de6-4517-8f82-514df26ac0f8

निवेदिता यांच्या या पोस्टवर अनेकांनी आपले मत मांडत आपण सहमत असल्याचे कमेंटद्वारे सांगितले आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही “खरंच आहे’ अशी कमेंट केली आहे. तर ‘आम्हालाही अनेक ठिकाणी असे अनुभव आले आहेत’ अशा कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!