Tractor

ट्रॅक्टरवरची स्टंटबाजी जीवावर बेतली; थरकाप उडवणारा Video व्हायरल

569 0

आजकाल लोकांमध्ये स्टंटबाजी करण्याची क्रेज निर्माण झाली आहे. जो तो उठतोय तो स्टंट करत सुटतोय. मात्र कधी कधी हे स्टंट आपल्या जीवावरदेखील बेतू शकतात. सध्या अशाच एका स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सायकल, बाईक किंवा कारवर केले जाणारे स्टंट (Stunt) पाहिले असतील. मात्र मेरठमध्ये एका ट्रॅक्टर कंपनीने ट्रॅक्टरचा डेमो दाखवताना स्टंटबाजी केली आणि हीच स्टंटबाजी त्यांच्या जीवावर बेतली.

काय घडले नेमके?
मेरठ येथील किठौर गावात हा भयानक अपघात घडला आहे. यामध्ये स्टंटबाजीच्या नादात एका ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा हा भीषण व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा ट्रॅक्टरवरचा स्टंट करतांना ट्रॅक्टर अचानक पलटला आणि अपघात (Accident) घडला. ट्रॅक्टरचा डेमो (Tractor Demo) देत असताना हा अपघात झाला.

किठोरेच्या कायस्थ बड्डा गावातला हा व्हिडीओ आहे. या घटनेमुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!